श्री क्षेत्र खंडोबा मंदिर पाली Khandoba Mandir Pali खंडेराया म्हटल की आपले कुलदैवत आपलेच नाही तर सर्व महाराष्ट्राचे कुलदैवत. बीड जिल्ह्यापासून दहा किलमीटरवर असलेले पाली गावामध्ये खंडोबाचं मंदिर आहे. हे मंदिर फार जुन्या काळातल आहे.या मंदिराचे बांधकाम जुन्या पदधतीने केलेले आहे.दगडाचे बांधकाम खूप मोठमोठाली शिलेदार दगडाचे मंदिर आहे.
खंडोबा तर आपणास सर्वांना माहीतच आहे की भोलेनाथ शिवशंकराचे अवतार आहे.या खंडोबा मदिराचे खूप मोठे मोठे भक्त आहेत.लोक तर या बीड मधल्या पाली गावच्या खंडोबाला नवस पण बोलतात.हे खंडोबाचे सुप्रसिद्ध मंदिर बिंदुसरा नदीच्या काठावर आहे.आणि विशेष म्हणजे या आपल्या खंडोबाच्या यात्रा नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यात असते.खूप मोठी यात्रा भरते.लोक बोकड कापतात कंदुऱ्या करतात.आणि जत्राच्या जल्लोष ह्वावा म्हणून कुस्त्या पण होतात ह्या कुस्त्या जुन्या काळापासून होतात आणि आजही ही परंपरा चालू आहे.अनेक कार्यक्रम होतात.
या मंदिराचे आणखी काही विशेष गोष्टी आहेत त्या म्हणजे मंदिराच्या बाजूला एक महादेवाचे मंदिर पण आहे.हे पण मंदिर प्राचीन काळातले आहे.याच पण बांधकाम दगडी आहे. आता या मंदिराचे बांधकाम झाले आहे पण मंदिराच्या समोर जुन्या दगडाच्या आज पण छोटस बांधकाम आहे.तुम्ही या मंदिराला भेट दिली तर आज पण तुम्हाला पाहायला मिळेल.
• खंडोबाच्या मंदिरामध्ये छान छान छायाचित्रे पेंट केलेले आहेत ते छायाचित्रे देवाचे महाराजांचे आहेत.ते म्हणजे संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज,महादेवाचे गुरुदत्त, आणि बजारांगबलीचे.Khandoba Mandir Pali
तिथेच मंदिरामध्ये चक्रधर स्वामींनी थोडे दिवस विश्राम केलेला आहे. आता त्या विश्राम केलेल्या जागेवर त्यांचे दर्शन करण्याची सोय केलेली आहे
• खंडोबा मंदिरा समोर डीकमाळ Khandoba Mandir Pali
हा तर खंडोबाच्या मंदिरासमोर आपल्याला दोन डीकमाळ्या आहेत.आणि त्या आजही पाहायला मिळतील एक डाव्या बाजूला आहे आणि एक उजव्या बाजूला आहे.या डिकमाळीचे महत्त्व खंडोबाच्या यात्रेला असते. यात्रेच्या वेळेस या
डीकमाळ्या वर मोठी वात लावतात.आणि जेव्हा खंडोबाला तेल लागते तेव्हा सर्व जण या डीकमाळी ला पुजाऱ्याच्या हाताने तेल टाकतात या डीकमाळ्या पण जुन्या काळातल्या आहेत.
• खंडोबाच्या मंदिराच्या समोर तर डीकमाळ्या आहेत.आणि डीकमाळ्याच्या बाजूला म्हणजे उजव्या बाजूला दैत्याच्या कोरलेल्या मुर्त्या आहेत.त्याच दैत्याला लोक बोकड कापतात.Khandoba Mandir Pali
• यात्रेच्या वेळेला किंवा इतर वेळेला जे कंदुरी करतात बोकड देवाला बोकड कापतात त्यासाठी एक वेगळी जागा आहे ती तुम्हाला खंडोबाच्या मंदिराच्या उजव्या बाजूला खालच्या अंगाला पाहायला मिळेल.तिथे कापण्याची सोय आहे.तिकडे जाण्यासाठी एक गेट बसवलेले आहे.तुम्ही भेट दिली तर जाऊ शकतात
• आणखी सांगायचे म्हणले तर मंदिराच्या समोरासमोर आपल्याला सभामंडप पाहायला मिळेल.पण आता त्या सभामंडपात आता स्वामी समर्थ यांच मंदिर आहे.या मंदिरामध्ये दर शनिवारी स्वामींची आरती होते.आणि या स्वामींच्या मंदिरात पारायण पण ठेवले जाते.
• खंडोबाच्या मंदिराच्या पाठीमागे छान असा पाहायला परिसर आहे.तो म्हणजे मंदिराच्या मागे मोठी नदी गेलेली आहे आणि या नदीमुळे पाठी मागील हिरवळपणा असतो. आणि महत्वाच म्हणजे खंडोबाचं मंदिर उंचावर आहे आणि आणि नदी खाली खोल आहे त्यामुळे वरतून पाहायला आणखी चांगले वाटते.
• मंदिरापासून थोड्याच अंतरावर एक देवीचे मंदिर पण आहे.ते पण तुम्हाला पाहायला मिळेल.तिथे तुम्ही दर्शनासाठी जाऊ शकता.त्याच देवीच्या मंदिराच्या बाजूला तिथेच चीटकून महादेवाचे दोन मंदिर आहेत.
खंडोबाच्या मंदिराकडे जाण्याचा मार्ग : Khandoba Mandir Pali
तर मी तुम्हाला सर्व मार्ग पहिल्यापासून सांगणार आहे.तो म्हणजे बीड पासून दहा किलोमीटर अंतरावर पाली हे गाव आहे. येथे येण्यासाठी बस उपलब्ध आहेत.किंवा तुम्ही रिक्षाने पण जाऊ शकता. पाली गावामध्ये आल्यावर जेव्हा तुम्हीं बसस्टॉप वर उतरल्यावर तुम्हाला उजव्या बाजूला ब्रीज दिसेल त्या ब्रिजखालून एक रस्ता दिसेल त्या बाजूला रोड क्रॉस करा.रोड क्रॉस करून झाल्यावर त्याच रोड ने दक्षिण दिशेने चालत या जोपर्यंत तुम्हा मेडिकल शॉप दिसत नाही.त्या मेडिकल चे नाव गौरी मेडिकल आहे त्या मेडिकल पासून उजव्या बाजूला एक रस्ता आहे तो रस्ता तुम्हाला खंडोबाच्या मंदिरात नेऊन सोडेल.
खंडोबाच्या मंदिराच्या दर्शनासाठी आल्यावर आजूबाजूला जाण्याची ठिकाणे
1. एक किलोमीटर अंतरावर बिंदुसरा डॅम ( Bindusara Dam ) पाहायला मिळेल.तिथे तुम्ही जाऊन तिथला आनंद घेऊ शकता.
2. खंडोबाच्या मंदिरापासून आठ दहा किोमीटरवर अंतरावर मन्मथ स्वामी महाराज मंदिर कपिलधार आहे. तिथे तुम्ही अवश्य भेट द्या.तुमचे दर्शन पण होईल आणि तिथे असलेला धबधबा पाहायला मिळेल.मोठा धबधबा आहे.या कपिलधार मंदिराकडे जाताना तुम्हाला निसर्गरम्य वातावरण पाहायला मिळेल.
3. तिथून थोड्या अंतरावर म्हणजे अठरा किलोमीटर वर श्री क्षेत्र चाकरवाडी मध्ये माऊली महाराजांचे मंदिर आहे.
Read More : https://marathikeeda.com/delhi-information-in-marathi/