How and when to plant papaya पपई ची लागवड कशी व कधी करावी ; पपई म्हंटल की तोंडाला पाणी सुटते.तुम्हाला लेख वाचताना पण सुटले असेल.सुटणाराच पपई खायला खूप छान लागते आणि हीच पपई आरोग्याच्या दृष्टीने पाहिले तर खूप उपायकारक आहे.आणि महत्वाच आपल्या सर्वांच्या अवडतीच फळ आहे.या पपई ला तर सर्वच खातात पण ज्याला याच महत्त्व माहिती आहे ते या पपई ला आवर्जून खातात.या पपई पासून आपल्या शरीराला अ, ब, क, आणि व येवढे सारे जीवनसत्व मिळतात. याच्या व्यतिरिक्त पपईच्या पानापासून भाजी पण बनवता येते.आणि भरपूर लोक या पणाची भाजी खूप आवडीने खातात. मी तुम्हाला जीवनसत्त्व बद्दल सांगितल्याप्रमाणे त्यातील महत्वाचा मुद्दा म्हणजे -अ- जीवनसत्त्व पपई मध्ये खूप जास्त प्रमाणात आहे.यामुळे आपल्या डोळ्याची (eye) दृष्टी खूप चांगल्या प्रमाणात सुधारते.आपण जो म्हणतोय ना रातांधळेपणा रातांधळेपणा याच पपई चे सेवन केल्यावर दूर होतो.असे खूप काही फायदे आहेत त्यामुळे डॉक्टर सांगतात ना पपई खात जा शरीरासाठी खूप लाभदायक आहे त्याची हीच करणे आहेत.या सर्व आरोग्याबाबत गोष्टीमुळे पपईची मागणी मार्केट मध्ये खूप वाढली आहे.आणि मार्केट मध्ये कमी पडत आहे. आणि याचा फायदा आपल्याला उचलायचा आहे पपई लागवड करून मार्केट ला विकायची आणि खूप नफा मिळवायचा.याची शेती काय खूप काही अवघड नाही अगदी सोपी पद्धत आहे पपईची शेती करण्याची.तर पाहूया पपईची शेती कश्याप्रकारे करतात पुढीप्रमाणे.
पपई लागवडीसाठी हवामान : पपई ची लागवड कशी व कधी करावी
पपई लागवडीच्या हवामानाचा विषय घेतला तर याला उष्ण तापाचे हवामान लागते आणखी एक दमट वातावरण असणे आवश्यक आहे. कारण या तापमानात पपई तर जास्त येतात. पण या उष्ण आणि दमटपणामुळे पपईला चव फार चांगली येते. जर आपल्याकडे 10 किंवा 12 अंश सल्सिअस पेक्षा कमी उष्ण तापमान असेल तर पपईच्या लागवडीला काही अर्थच नाही.एक तर फळे भरून येत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे झाड झाडाची वाढ खुटते थांबते. तसेच वाढ न झाल्यामुळे पपईला फळच येत नाही.अती जास्त प्रमाणात वादळ वारे पपईला जमत नाही.हे लक्षात घ्यावे लागेल.आणि थंड तापमानात तर पपईची चव बेचव लागते याचा अर्थ थंड हवामान चालत नाही.
पपई लागवडीसाठी जमीन
जमिनीचा विषय घेतला तर हा खूप महत्वाचा विषय आहे.या लागवडीला जवळ पास सुपीक असलेली जमीनच लागते. काळी असलेली मध्यम पण चालते पण चांगली फळे उत्पादन काढण्यासाठी काळी मस्त अशी नीचऱ्याची जमीन लागते.जेणे करून पाण्याचा चांगला निचरा ह्वावा. खडकाळ आणि मुरमाड जमिनीत पपईचे उत्पादन काढता येत नाही. त्यामुळे अश्या जमिनीमध्ये लागवडीचा विचार करू नये.
पपई लागवडीचा कालावधी( वेळ ) पपई ची लागवड कशी व कधी करावी
पपई लागवडीसाठी कालावधी म्हंनल तर जवळ पास एका वर्षाच्या 12 महिन्यांमध्ये तीन वेळा तुम्ही करू शकतात.त्यामध्ये पण काही महिने आहे त्या महिन्यात करावी लागते ते म्हणजे जून आणि जुलै महिन्यात करू शकतात.तसेच सप्टेंबर मध्ये किंवा ॲक्टोबर मध्ये / फेब्रुवारीत मार्च मध्ये करणे योग्य ठरते. ह्या सांगितलेल्या सर्व वेळ एकदम चांगली वेळ आहे.
पपई लागवडीसाठी जाती. पपई ची लागवड कशी व कधी करावी
• कोयांबतुर – 1
या कोयांबतुर पपईच्या जातीची झाडे जवळपास लहान उंचीची म्हणजे बुटकी(small ) असतात. या जातीची झाडे जर आपण शेतामध्ये लावली तर जेव्हा फळ चालू होते तेव्हा सर्व झाडी एकच आकारात दिसतील. या कोयांबतुर- 1 जातीच्या झाडाची फळांचा आकार गोल असा असतो तसेच पपई लांबीला जास्त मोठी नसते.
• कोयांबतुर – 2
या कोयांबतुर – 2 जातीची उंची (वाढ) जास्त मोठी पण नसते आणि जास्त लहान पण नसते. या जातीच्या झाडाच्या पपईच्या फळाचा आकार जाड नसून लांब जास्त असते.
• वॉशिंग्टन
या वॉशिंग्टन जातीचा विषय घेतला तर या जातीच्या झाडे एक सारखी आणि बुटकी अशा आकाराची असतात. पण याचे फळ वजनाला सुपर आहे.सुमारे एक पपईच वजन पाऊण किलो ते एक किलोच्या आसपास भरते यामुळे मार्केट मध्ये किलो वर विकायचे ठरवले तर जास्त नफा मिळवणारी जात आहे. या जातीच्या झाडाची फळे गोल तर असतातच पण पण लांबीला जास्त आणि लंबुळी अशी असते. पपई ची लागवड कशी व कधी करावी
• अशा अनेक जाती आहेत कूर्ग हाडीनिव, कोयांबतुर-3 कोयांबतुर-4 कोयांबतुर-5 कोयांबतुर-6 बारवाणी लाल आणि पुसा जायट इत्यादी या जातीची पण आपण लागवड करू शकता.
पपई लागवड पद्धत.तर पपई लागवड कशी करायची त्या साठी पहिल्यांदा जमिनीची चांगल्या प्रकारे मशागत करून घेतली पाहिजे जमीन सुपीक करून घेतली पाहिजे.जमिनीचा आकार एकसारखा करून घेतला पाहिजे.जेव्हा आपली शेती सुपीक करून घेतल्यावर सर्वात पहिल्यांदा खड्डे खांदावे लागतील तेही जेवढे तुमची झाडे आहेत तेवढी. नंतर त्या खड्ड्यामध्ये शेणखत,सुपर फॉस्फेट,निंबोळी खत आणि पोटॅश हे सर्व खत मिक्स करून खड्ड्यामध्ये टाकावे.हे सर्व टाकून झाल्यावर पुढची स्टेप म्हणजे सर्व खड्ड्याला चांगल्या प्रकारे आळे करून घेण्याचे काम करावे.ते झाल्यानंतर सर्व आळे पूर्णपणे पाण्याने भिजून घेणे तेही व्यवस्थितपणे.हे सर्व सांगितलेले कार्य पूर्ण करून झाल्यानंतर जो पर्यंत पपईचे झाडे लावण्यासाठी वापस येत नाही तोपर्यंत थांबावे साधारणता दोन किंवा तीन दिवस नंतर झाडे लाऊन घेण्याचे काम करावे.
पपई लागवड पाणी व्यवस्था : पपई ची लागवड कशी व कधी करावी
हा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पाणी.पाण्याशिवाय आजकाल कोणतेच फळ पीक येत नाही.आणि पपई साठी तर तुम्हाला ठिबक सिंचन असणे अत्यंत महत्वाचं आहे.पपईच्या झडला जास्त पाण्याची क्षमता चालत नाही यांनी झाडे खराब होतात.त्यामुळे ठिबक असल्यामुळे झाडे खराब होण्याची काळजी राहत नाही.ठिबकचा आणखी एक फायदा असा आहे की फळ जिथे पाऊण किलो भरायच तिथे एक किलो भरते.
पपई काढणी : पपई ची लागवड कशी व कधी करावी
आठ किंवा नऊ महिने लागवड होऊन झाल्यानंतर तुमची इनकम चालू झाली समजा कारण झाडाला पीक चालू झाले आणि पिकले पण असतील.पपईचे झाड असे आहे की सारखे सारखे फळे चालूच राहतात.त्यामुळे फक्त पिकलेले आणि डोळे असलेले फळच तोडावे.तोडण्याची पद्धत कोणते पण फळाच झाड असूद्या कधीपण फळे तोडताना फळाच्या देठापासून फळ तोडावे.
Read More : https://marathikeeda.com/moringa-planting-information/