Industries and benefits of stale bread आपण सर्वात पहिल्यांदा भाकरीच्या शिळ्या तुकड्याचे उद्योग आणि फायदे शिळे तुकडे म्हणले की आपल्याला खमंग नाष्टा आठवतो,भाकरीच्या शिळ्या तुकड्याला मीठ लावलेले खायला आवडते,शिळ्या तुकड्यांचा भात आठवतो आणि शिळ्या तुकड्यांचा चिवडा आठवतो पण यापेक्षा पण आणखी या भाकरीच्या शिळ्या तुकड्यांचे फायदे आहेत.
हे आपणास माहीत आहे का? या भाकरीच्या तुकड्याचे भरपूर फायदे आहेत आणि याचे उद्योग पण आहेत.आणि भरपूर प्रमाणात ह्या भाकरीच्या शिळे तुकडे विकत घेण्याचा उद्योग करतात.आणि खूप पैसे कमावतात.तर तुम्ही म्हणत असाल यापेक्षा अधिक काय फायदे असू शकतात हे मी तुम्हाला पुढीप्रमाणे सांगणार आहे .भाकरीच्या शिळ्या तुकड्यांचा व्यवसाय /उद्योग : भाकरीच्या शिळ्या तुकड्याचे उद्योग आणि फायदे
तर आपला विषय आहे भाकरीच्या शिळ्या तुकड्यांचा उद्योग कसा करावा.तर हा उद्योग खूप सोपा आहे.आणि खूप कमी बजेट मध्ये आपण पण हा व्यवसाय चालू करू शकतो.हा व्यवसाय म्हणजे घरो घरी जाऊन भाकरीचे शिळे तुकडे घेणे आणि त्या बदल्यात त्यांना पैसे किंवा वस्तू देणे.
वस्तू देणे म्हणजे तुम्ही भाकरीच्या शिळ्या तुकड्यांचा बदल्यात तुम्ही त्यांना त्यांचे तुकड्याचे वजन करून त्याचे भाव ठरून घरगुती साहित्य म्हणजे साबण,निरमा पुडा,मीठ पुढे,तेलाचे पुढे,भांडे घासायच्या घासण्या आणखी तुम्हाला वाटतील त्या घरगुती वस्तू देऊन भाकरीचे तुकडे विकत किंवा वस्तू देऊन घेऊ शकतात.हे अगदी सोप आहे कारण महिलांना तेच पाहिजे असत आपल्याला शिळ्या तुकड्यांचा बदल्यात घरगुती वस्तू किंवा खर्च करण्यासाठी पैसे मिळतात.
हे सर्व तुकडे विकत घेऊन काय करायचे हा प्रश्न तुमच्या मनात पडला असेल.कारण तुकडे तर गोळा केले आहेत पण याचा फायदा काय आहे तर याचे खूप फायदे आहेत.तर म्हणजे तुम्ही हे विकत घेतलेले तुकडे पशू खाद्य बनावनाऱ्या कारखान्याला जास्त पैश्यात विकून खूप मोठा नफा मिळवू शकतात.येवढाच नाही तर या भाकरीच्या शिळ्या तुकड्याला तुम्ही शेतकऱ्याला सुग्रास बनवण्यासाठी घेतलेल्या भावापेक्षा तुम्ही जास्त पैसे घेऊन विकू शकतात.आणि जास्त पशू पालन करणारे शेतकरी या शिळ्या तुकड्याची मागणी खूप करतात.व्यवसाय करणाऱ्याला तुकडे कमी पडतील पण शेतकरी घेण्यासाठी कधीच कमी पडणार नाही.हा व्यवसाय सद्ध्या खूप ट्रेंड मध्ये आहे. किंवा तुम्ही विकत घेतलेल्या शिळ्या तुकड्यापसून स्वतः
पशू खाद्य/ सुग्रास बनवण्याचा छोटासा व्यवसाय चालू करून लाखो रुपये कमाऊ शकतात.तर हा तुकडे विकत घेण्याचा व्यवसाय कसा चालू करायचा आणि हा व्यवसाय करण्यासाठी काय काय लागते हे मी तुम्हाला पुढीप्रमाणे सांगणार आहे.
भाकरीचे शिळे तुकडे विकत घेण्यासाठी लागणारे साहित्य
तर आपण वरील सांगितल्याप्रमाणे पहिलाच आहे की शिळ्या तुकड्यापासून आपण काय करू शकतो.पण हा व्यवसाय स्टेप बाय स्टेप कसा चालू करायचा यासाठी तुमच्याकडे कोणकोणते साहित्य असणे गरजेचे आहे ते पहा तर सर्वात पहिल्यांदा
तुमच्याकडे एक वाहन असणे आवश्यक आहे.वाहन म्हणजे तुम्ही सुरवातीला एक छोटा मालवाहतुकीचा रिक्षा विकत घेणे. कमी बजेट असेल तर सेकंड घेतला तरी चालेल.रिक्षा घेऊन झाल्यानंतर त्या रिक्षाला एक करना स्पीकर विकत घेऊन बसवावा लागेल.जेणेकरून त्या स्पीकरद्वारे तुम्ही तुकडे विकत घेण्यासाठी संवाद साधू शकता.आणखी तुम्हाला भाकरीचे शिळे तुकडे विकत. भाकरीच्या शिळ्या तुकड्याचे उद्योग आणि फायदे
घेण्यासाठी एक इले्ट्रॉनिक वजन काटा घेणे आश्यक आहे कारण तुकडे विकत घेण्यासाठी वजन करून घ्यावे लागतात.आणखी म्हणजे तुकड्यांचा बदल्यात ज्या काही घरगुती वस्तू द्यायच्या आहेत त्या खरेदी करून घ्याव्या लागतील. तर हा व्यवसाय चालू करण्यासाठी वरील सांगितल्याप्रमाणे या सर्व वस्तू साहित्य तुमच्याकडे असणे आवश्यक आहे.
आम्ही तुम्हाला भाकरीच्या शिळ्या तुकड्याचा व्यवसाय कसा करायचा आणि व्यवसायाला लागणारे साहित्य याबद्दल माहिती दिली आहे आता या भाकरीच्या शिळ्या तुकद्यापासून बनलेले खाद्य/सुग्रास याचा शेतकऱ्यांना काय आणि कसा फायदा होतो आणि शिळ्या तुकड्यांचा आणखी काय काय फायदे आहेत हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर पहा पुढीलप्रमाणे.
पशुखाद्य फायदे
तर आपण वरील पाहिल्याप्रमाणे भाकरीच्या शिळ्या तुकड्यापासून बनवलेले पशू खाद्य/ सुग्रास यापासून जनावरे सुधारतात त्यांना हे खाद्य म्हणजे आपण खाल्लेल्या काजू बादामासारख आहे. हे खाद्य जनावरांना खाऊ घातल्यास दुधात वाढ होते. जनावरांचे चांगले पोषण होते.जनावरांना जे पोषक आहार जे रोजच्या चाऱ्यातून मिळत नाही ते या पशू खाद्य खायला दिल्यावर मिळते.
शिळ्या तुकड्यापासुन कोंबड्यांना फायदे : भाकरीच्या शिळ्या तुकड्याचे उद्योग आणि फायदे
तर आपण आपण पशुखाद्य पाहिले पण आता भाकरीच्या शिळ्या तुकड्यांचा कोंबड्यांना पण फायदा होतो. तो कसा हे जाणून घेऊयात.भाकरीचे शिळे तुकडे उन्हामध्ये चांगले वाळून घ्यावे वाळून घेलतल्यावर त्या शिळ्या तुकड्यांचा बारीक बुकटा करून कोंबड्यांना खाद्य म्हणून टाकावा. भाकरीच्या शिळ्या तुकड्याचे उद्योग आणि फायदे
या खाद्यापासून कोंबड्याला पोषक आहार मिळतो, वजनाला फरक पडतो आणि वाढ लवकर होते. येवढे सर्व फायदे होतात आणि घरातील शिळे झालेली भाकरीचे तुकडे वयाला जात आणि अशाप्रकारे आपण शिळ्या तुकड्यांचा फायदा घेऊ शकतात.
Read More : https://marathikeeda.com/5-healthy-fruit-and-vegetable-juices-for-summer-health/