Tuesday, November 28, 2023
HomeRECIPESकचोरी रेसिपी मराठी Kachori Recipe In Marathi

कचोरी रेसिपी मराठी Kachori Recipe In Marathi

Kachori Recipe In Marathi कचोरी बनवण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम कचोरीची कणिक बनवावी लागेल. कचोरीची कणीक बनवण्यासाठी आपल्याला मैदा आवश्यक आहे. तसेच कचोरीचा मसाला बनवण्यासाठी आपल्याला मुगडाळ, 

कस्तुरी मेथी ,लाल मिरची पावडर, धने पावडर ,गरम मसाला पावडर, आमचूर पावडर ,काळी मिरी पावडर, बेसन, हिंग ,हिरव्या मिरच्या, पिठीसाखर ,जिरे पावडर ,बडीशेप पावडर, आणि तळण्यासाठी तेल आवश्यक आहे.

कचोरी बनवण्यासाठी लागणारी सामग्री

 1. चार वाटी मैदा
 2. चार चमचे तूप
 3. चार चमचे मुगडाळ
 4. दोन चमचे कस्तुरी मेथी
 5. चार चमचे लाल मिरची पावडर
 6. एक चमचा धने पावडर
 7. दोन चमचे गरम मसाला पावडर
 8. एक चमचा काळी मिरी पावडर
 9. एक चमचा आमचूर पावडर
 10. आठ चमचे बेसन
 11. दोन चमचे हिंग
 12. पाच ते सहा चिरलेल्या हिरव्या मिरच्या
 13. दोन चमचे पिठीसाखर
 14. दोन चमचे बारीक केलेले जिरे
 15. दोन चमचे बारीक केलेले बडीशेप

तळण्या आवश्यक लागणारे तेल कचोरी बनवण्यासाठी कृती : Kachori Recipe In Marathi

आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा एक भांडे घ्यायची आहे .ज्यामध्ये मीठ तूप मैदा हे टाकून चांगले मिक्स करायचे आहे. त्यानंतर तो मिक्स केलेला पिठाचा गोळा 30 मिनिटांसाठी झाकून ठेवायचा आहे.

ह्या वेळेत आपल्याला मुगडाळ पाण्यामध्ये भिजू घालायची आहे .ही मुगडाळ भिजून भिजून फुगली की आपल्याला त्यातील पाणी काढून टाकायचे आहे .ही भिजलेली मूग डाळ आपल्याला भरडा स्वरूपात मिक्सरवाटे काढून घ्यायची आहे.

आता आपल्याला आणखीन एक छोटे भांडे घ्यायचे आहे ह्या भांड्यामध्ये आपल्याला हळद, चवीनुसार लागणारे तिखट ,गरम मसाला, धने पावडर ,काळी मिरी पावडर ,कस्तुरी मेथी, आमचूर पावडर आणि चवीनुसार लागणारे मीठ हे सर्व एकत्र करून मिक्स करून घ्यायचे आहे. Kachori Recipe In Marathi

हे सर्व मिश्रण तयार झाल्यानंतर व पिठाचा गोळा अर्धा तास ठेवल्यानंतर आपल्याला कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचे आहे. या तेलामध्ये हिरवी मिरची, बारीक केलेली बडीशेप, बारीक केलेले जिरे, हिंग भाजून घ्यायचे आहेत.

हे सर्व भाजून घेतल्यानंतर आपण बनवलेले मसाल्यांचे मिश्रण आणि बेसन घालून त्याचा रंग थोडासा बदलेपर्यंत भाजून घ्या. हे सर्व भाजून घेतल्यानंतर ह्या सारणामध्ये आपल्या चवीनुसार पिठीसाखर आणि भिजत घातलेली मूग डाळ घाला आणि हे सर्व मिश्रण व्यवस्थित एकत्र करून घ्या . Kachori Recipe In Marathi

हे सर्व मिश्रण एकत्र झाल्यानंतर त्यामध्ये थोडे पाणी घालून हे सारण थोडा वेळ शिजवून घ्या .आपल्याला याचे गोळे बनवायचे असल्यामुळे हे सारण घट्ट होईपर्यंत शिजवा. हे सारण तयार झाल्यानंतर थंड करून घ्या आणि मग त्याचे छोटे छोटे गोळे बनवा. Kachori Recipe In Marathi

आता आपल्याला आपण मळून ठेवलेली कणीक घ्यायची आहे. या कणकीचे आपल्याला आपण बनवलेल्या सारणापेक्षा मोठे असे गोळे बनवून घ्यायचे आहेत आणि ह्या कणकेच्या गोळ्यांमध्ये आपण बनवल्या सारणाचे गोळे भरून घ्यायचे आहेत.

ज 7अशा पद्धतीने आपली कचोरी तयार होईल आता आपल्याला कचोरी तळण्यासाठी गॅसवर कढईमध्ये तेल आवश्यकतेनुसार घ्यायची आहे आणि आपण बनवलेले हे गोळे आपण आपल्या हातानं सावकाश तेलामध्ये सोडायचे आहे. हे गोळे व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत आणि आपली ही कचोरी व्यवस्थित तळून घ्यायची आहे. याच पद्धतीने आपल्याला आपण बनवले सर्व गोळे तळून घ्यायचे आहेत म्हणजे आपली ही घरगुती कचोरी तयार होईल .

कचोरी तयार झाल्यानंतर आपल्याला खाण्यासाठी आपण कचोरी सोबत लाल चटणी, चिंचेचं चटणी दह्याची चटणी देखील खाऊ शकतो.

Read more : https://marathikeeda.com/7-best-cooling-foods-for-the-indian-summer-in-marathi/

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments