Friday, November 24, 2023
HomeRECIPESMilk Products Information in Marathi दुधापासून बनवले जाणारे पदार्थ

Milk Products Information in Marathi दुधापासून बनवले जाणारे पदार्थ

नमस्कार मित्रांनो आज आपण आजच्या लेखांमध्ये पाहणार आहोत की Milk Products Information in Marathi पदार्थ तयार होतात.

दुधापासून बनवले जाणारे पदार्थ Milk Products Information in Marathi

  1. खवा
  2. बासुंदी
  3. रबडी
  4. दही
  5. लस्सी
  6. पनीर

तर मित्रांनो आपण वरीलपैकी सर्व पदार्थ आपण दुधापासून बनवू शकतो. आणि त्या पदार्थापासून आपल्याला बराच फायदा होतो.

आज जर आपण पाहिलं तर आपल्या भारत देशामध्ये विविध प्रकारच्या दूध संघटना दूध व्यवसायिक आणि असे खूप सारे दुधापासून उद्योग आहेत. याच्यापासून आपले शेतकरी बांधव आणि आपल्यासारखे लोक खूप सारे पैसे कमवतात तर मित्रांनो पुढीलपैकी आपण पाहूयात की दुधापासून कसे विविध पदार्थ बनवतात.

घरी तयार करा मावा,खवा : Milk Products Information in Marathi

Milk Products Information in Marathi
Milk Products Information in Marathi

दुधापासून बनवला जाणारा खवा हा एक पदार्थ आहे. या गावालाच मावा असे पण म्हटले जाते आपण या खाव्यापासून विविध प्रकारच्या बर्फी, पेढे, गुलाबजामून, कुंदा, कलाकंद असे खूप सारे पदार्थ तयार करू शकतो. तर मित्रांनो आपण पुढे पाहूयात की खवा कसे बनवतात तर मित्रांनो सर्वात आधी आपण एक कडे घेऊ आणि त्या कढईमध्ये दूध टाकावे आणि त्या कडेला खालून थोडा जाळ लावावा. 

व तसे केल्यानंतर ते दूध हळूहळू गरम होईल आणि आपण ह्या दुधाला सारखं हलवीत राहावे जोपर्यंत हे दूध चांगले घट्ट होत नाही. तोपर्यंत आपण दुधाला हलवीत राहिले पाहिजे असं केल्यानंतर आपले दूध हळूहळू घट्ट होत. जाईल आणि त्याचे रूपांतर खव्यामध्ये होईल तर दुधामध्ये पण दोन प्रकारचे दूध असतात एक गाईचे दूध आणि एक म्हशीचे दूध गाईचे दूध एवढे घट्ट नसते गायीच्या दुधापासून लवकर खवा बनत नाही. 

तर म्हशीचे दूध हे खूप घट असते त्याच्यामुळे म्हशीच्या दुधाचा खवा लवकर बनतो आणि खायला पण चविष्ट लागतो आपण या खाव्यापासून अशा खूप सार्‍या पदार्थ बनवू शकतो जसे की बर्फी गुलाबजाम होऊन अशाप्रकारे आपण खव्यापासून पदार्थ बनवतो.

घरी तयार करा बासुंदी : Milk Products Information in Marathi

Milk Products Information in Marathi
Milk Products Information in Marathi

तर मित्रांनो आपण खूप सार्‍या लग्नकार्यात किंवा अशा खूप साऱ्या कार्यक्रमात पाहिले असेल की जेवणामध्ये लोक बासुंदी करतात. व ही बासुंदी आपल्याला खूप आवडते तर मित्रांनो चला तर पाहूया बासुंदी कशी बनते ही बासुंदी आपण दुधापासून बनवतो तर मित्रांनो सर्वात आधी आपले दूध स्टीलच्या पातेल्यामध्ये उकळत ठेवायचे.

व त्याच्यानंतर दूध उकळत असताना ते सारखे दूध हलवत रहावे वर त्याच्यामध्ये काही प्रमाणात साखर घालावी व ते दूध घट्ट होईपर्यंत गरम करीत राहावे. व असेच प्रक्रिया जोपर्यंत दूध 50 ते 55 टक्के कमी होत नाही तोपर्यंत ही प्रक्रिया तशीच चालू ठेवावी. व त्याच्यानंतर गॅस बंद करावा व त्याच्यानंतर हे दूध एका थंड जागेवर ठेवावे जोपर्यंत दूध थंड होत. 

नाही तोपर्यंत काहीच करायचे नाही व ते दूध थंड झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडेसे काजू बदाम व तुम्ही त्याच्यामध्ये अजून काही पण टाकू शकता. व असं केल्यानंतर आपली बासुंदी तयार होईल वही बासुंदी आपण ज्या दिवशी तयार केली त्याच दिवशी खायला पाहिजे व आपण जर फ्रीजचा वापर केला. तर ही बासुंदी आपल्याला दोन ते तीन दिवस चांगली राहायची शक्यता आहे व आपण ती बासुंदी दोन ते तीन दिवस खाऊ शकतो.

घरी तयार करा रबडी : Milk Products Information in Marathi

Milk Products Information in Marathi
Milk Products Information in Marathi

तर मित्रांनो आपण सर्वांनी रबडी ही एकदा का होईना खाल्ली असेल रबडी ही खूप गोड आणि खूप चवदार असते तर चला मित्रांनो आपण जाणून घेऊयात की रबडी हा पदार्थ कसे बनवतात. तर सर्वात पहिले रबडी हा पदार्थ करण्यासाठी दूध एका कढईमध्ये घ्यायचे व ते एका थोड्या जाळावर तापायला ठेवायचे व त्या दुधावर येणारी साय ही तशीच वेगळ्या भांड्यामध्ये साठवत ठेवायची. 

व दुधाला जास्त जास्त येण्यासाठी दुधाला गरम करत राहायचं व तसेच दूध थोडे घट्ट झाल्यानंतर त्याच्यामध्ये पाच ते सहा टक्के साखर टाकायची व त्याच्यानंतर दुधावर येणारेस जमा झाल्यानंतर काढून घ्यायची. आणि त्याचे छोटे छोटे तुकडे करायचे व नंतर ते दूध थंड करून घ्यायचे अशाप्रकारे आपली रबडी तयार होते.

घरी तयार करा दही : Milk Products Information in Marathi

Milk Products Information in Marathi
Milk Products Information in Marathi

तर मित्रांनो आपल्या सर्वांच्या घरी जेवणामध्ये दही चा वापर नक्की होत असेल पण दही पासून खूप सार्‍या भाज्या पण बनवतो. आणि दही चा वापर घरी जास्ती प्रमाणात करतो दही हा असा पदार्थ आहे. 

की दही आंबट पण लागते तरी पण आपण ते दही खातो तर मित्रांनो चला पाहूया आपण दही कसे बनवते तर मित्रांनो दही तयार करण्यासाठी आपण जे दूध घेतले आहे. ते साधारणपणे त्याच्यामध्ये एक टक्का एवढा विर्जन टाकावे व तसेच चांगले दही बनवण्यासाठी प्रतीचे विरजण खूप महत्त्वाचे आहे

व विदनासाठी दोन-तीन दिवसाचे दही वापरणे खूप गरजेचे आहे तसे झाल्यानंतर ते पूर्ण मिक्स करून घ्यावी. व विर्जन मिसळल्यानंतर ते पातेले झाकून ठेवावे व असे दही तयार होण्यासाठी कमीत कमी 13 ते 14 घंटे लागतात तर मित्रांनो अशा प्रकारे आपण घरच्या घरी दही बनवू शकतो. आणि मित्रांनो आपण दही बनवता बनवता दह्यापासून आपण ताक पण बनवू शकतो. ताक बनवण्यासाठी दही मध्ये थोडे पाणी टाकावे आणि तेच मिक्सरमधून काढून घ्यावे अशाप्रकारे आपले चांगले ताट पण तयार होते तर तुम्ही हे नक्की घरी करून पहा.

घरी तयार करा लस्सी : Milk Products Information in Marathi

Milk Products Information in Marathi
Milk Products Information in Marathi

लस्सी बनवण्यासाठी चांगल्या प्रकारचे दुधापासून आपण जे दही बनवले होते. ते घ्यावे थोडे आंबट असायला पाहिजे व त्या दह्यापासून आपल्याला चांगल्या प्रकारची लस्सी बनवता येते व एकट्या दह्यामध्ये 12 ते 15 टक्के चांगले पाणी मिक्स करून घ्यावी हे पूर्ण एका मिक्सर मध्ये काढून घ्यावे व 

तसेच त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि साखर टाकावी व सर्व मिक्स करून नीट घ्यावे. असं केल्यानंतर आपली चांगल्या प्रकारची लस्सी तयार होईल व ही लस्सी लोक उन्हाळ्यामध्ये खूप आवडीने पितात आपण लस्सीचा घरी उद्योग पण करू शकतो. लस्सीचा उद्योग हा आपण फक्त उन्हाळ्यात करू शकतो कारण उन्हाळ्यामध्ये लस्सीला खूप मागणी असते.

घरी तयार करा पनीर : Milk Products Information in Marathi

तर मित्रांनो तुम्ही तुमच्या आहारामध्ये कधी ना कधी पनीरची भाजी खाल्ली असेल तर मित्रांनो कधी विचार केला आहे. का तुम्ही की हा पनीर कसे तयार होते तर मित्रांनो आपण जाणून घेऊयात की हे पनीर कसे तयार होते. तर मित्रांनो सर्वात आधी आपण दूध घ्यावे दूध घेतल्यानंतर ते चांगल्या प्रकारे उकडून घ्यावे उकडून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये थोडा लिंबाचा रस टाकावा. 

व लिंबाचा रस टाकल्यानंतर आपले दूध चांगल्या प्रकारची फुटून जाते व फुटल्यानंतर ते थोडे थंड करून घ्यावे व थंड केल्यानंतर ते फुटलेले दूध कापडामध्ये गाळून घ्यावे व कापडामध्ये गळल्यानंतर ते कापड घट्ट बांधावे आणि त्याच्यानंतर त्याच्यावर थोडे गार पाणी टाकावे व गार पाणी टाकल्यानंतर त्या कापडावर थोडे वजनदार वस्तू ठेवावी. 

अशा प्रकारे आपले पनीर तयार होते व नंतर ते कापड सोडून त्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यावे असं केल्यानंतर आपले पनीर चांगल्या प्रकारे तयार होते व आपण पनीर घरी पण करू शकतो. तर तुम्ही नक्की घरी करून पहा

तर मित्रांनो आज आपण आजच्या लेखांमध्ये पाहिले आहे. की दुधापासून कोणकोणते पदार्थ तयार होतात तर मित्रांनो तुम्हाला हा लेख कसा वाटला ते आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा धन्यवाद.

Read More : https://marathikeeda.com/best-homemade-tandoori-chicken/

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments