Moringa Planting Information शेवगा म्हटल की आपल्या रोजच्या भाजितला आवडता मेनू.या शेवग्याची भाजी आपण खूप आवडीनें खातो कारण खायला खूप खमंग आणि चविष्ट आहे.आणि शरीरासाठी तर खूपच उपयुक्त आहे.आणि आपल्या भारत देशात खूप प्रसिद्ध आहे.आणि आपण याच शेवग्याची लागवड कशी करायची आणि आपल्याला याचा फायदा कसा आणि किती होईल हे जाणून घेणार आहोत.शेवगा लागवड छा विषय घेतला तर आज खूप सारे शेतकरी याची लागवड करत आहे.कारण या शेवग्याची शेंगाची मागणी मार्केट मध्ये खूप वाढली आहे. आणि माल कमी पडत आहे.त्यामुळे आपण याचा फायदा घेतला पाहिजे तर पाहूया चांगल्या प्रकारे कशी शेवगा लागवड करता येते.
शेवगा लागवडीसाठी हवामान. Moringa Planting Information
तर खूप मोठा काही प्रश्न नाही कारण शेवगा तुम्ही तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा करू शकता याला काही हवामानाची गरज काही लागत नसते. पण सर्वात महत्वाचं म्हणजे या शेवगा पिकाला जास्तीत जास्त तापमान आणि जास्त कमीही हवामान चालत नाही. तस काही आपल्याकडे तर कमी जास्त अस होत नाही.या पिकाला कमीत कमी 22 ते जास्तीत जास्त 34 किंवा 35 अंश सेल्सिअस तापमान या प्रमाणात योग्य आहे.या तापमानात तुमचे पीक चांगल्याप्रकारे येते.
शेवगा लागवडीसाठी जमीन Moringa Planting Information
जमीन तर खूप लहान विषय आहे कारण या शेवगा लागवड करण्यासाठी कोणतीही आणि कसल्याही प्रकारची जमी या लागवडीला वापरू शकता.कारण हे शेवग्याचे झाड खूप चिकाटीचे आहे कुठे पण लावले तरी उगवते. कधी पण जेव्हा आपण शेवगा लागवड करायचा विषय घेतला तर हलकी जमीन मुरमाड जमीन किंव्हा आपल्याकडे असलेले माळरान यामध्येच करावी कारण या असल्या जागेमध्ये याचे उत्पादन जास्त होते आणि उपयुक्तही आहे.चांगल्या पाणी ओसून घेणाऱ्या जमिनीमध्ये याचे जास्त उत्पादन होत नाही.
शेवगा लागवडीसाठी वेळ Moringa Planting Information
हे पण महत्वाच आहे लागवड कधी केली पाहिजे त्याची उत्तम वेळ कोणती जेकरून की आपला फायदा झाला पाहिजे तर या शेवगा लागवड या दोन महिन्यात करणे योग्य ठरेल ते म्हणजे जून किंव्हा जुलै.या महिन्यात का करावे याच पण एक कारण आहे या दोन महिन्यांमध्ये हवेच्या अद्रतेचे प्रमाण वाढते आणि हेच अद्रतेच प्रमाण यासाठी उपयुक्त आहे.येवढाच नाही तर उन्हाच प्रमाण जास्त असलेले तापमान कमी होते आणि या हवामानात आपल्याला शेवगा लागवडीस मदत होते. Moringa Planting Information
शेवगा लागवड पद्धत
आपल्याला तर या छोट्या छोट्या बेसिक गोष्टी माहीतच असतात.की शेवगा लागवड कश्याप्रकारे करता येते.याच्या बिया पण उपलब्ध असतात .आणि याच्या कड्या लाऊन पण शेवगा लागवड करू शकतात.पण जास्त प्रमाणत तज्ञ लोक अस म्हणतात की बीजरोपण पासून सुरवात करा. आणि महत्वाचं म्हणजे या लागवडीच अंतर अडीच ते तीन मीटर येवढ असल पाहिजे.तुम्ही या शेवगा लागवडीसाठी लागणारी रोप मार्केट मधून खरेदी करून अनु शकता किंवा तुमच्या शेतामध्ये सुद्धा तयार करू शकता.Moringa Planting Information
या शेवगा लागवडीसाठी तुम्हाला खड्डे खांदावे लागतील आणि तेही दोन किंवा अडीच फूट येवढे.हाताने खांदलेले तर खूप उपयुक्त ठरतील.खड्डे खांदून झाल्यावर पुढची स्टेप म्हणजे तुमच्या शेतामध्ये असलेले जनावरांच्या शेणापासून बनलेले शेणखत खड्ड्यात थोडे थोडे टाकावे.आणि 200 ते 250 ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट आणि निंबोळी खत हे सर्व खांदलेल्या खड्ड्यामध्ये मिक्स करून घ्यावे आणि खड्डा जमीन लेवल भरून घेण्याचे कार्य करावे आणि सर्व खड्डे आळे करून भिजून घ्यावे आणि एक दिवस थांबावे.Moringa Planting Information
त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या भिजून घेतलेल्या खड्ड्यामध्ये शेवगारोपण चांगल्या पद्धतीने करू घ्यावे.जेव्हा खड्ड्यामध्ये शेवगा रोपण असता त्या वेळी एका खड्ड्यामध्ये एकच रोप लावणे अनिवार्य आहे.याची काळजी घ्यावी. यामध्ये आपल्याला कोणत्या जातीचे शेवगा लागवड करायची आहे हे तुम्ही निवडू शकता.त्यामध्ये कोणकोणत्या जाती आहेत ते मी सांगणार आहे ते पुढीलप्रमाणे कोईमतुर1, कोईमतुर2, पीकेएम1, पीकेएम2, कोकण रुचिरा, रोहित, जाफना आणि भाग्या इत्यादी जातीमधील तुम्ही कोणतीही लागवड करू शकता.
खताचे व्यवस्थापन
खताचा विषय घेतला तर तुम्हीं जवळपासच्या कृषी केंद्रात याची माहिती घेऊ शकता. अस काही कभी आम्ही पण आमच्या प्रकारे सांगणार आहोत.आपले शेवग्याचे पिकाचे योग्य आणि चांगल्या प्रकारे वाढ ह्वावी याची काळजी तर आपण घेतली पाहिजे.तर आपल्याला झाडाला खत घालणे आवश्यक आहे. त्यामध्ये पावसाळ्याच्या तोंडाला किंवा पाऊस पडल्यावर सर्व लावलेल्या शेवग्याच्या झाडाला जनावरांचे शेणखत टाकावे ते ही एका झाडाला आठ ते 12 किलो येवढे टाकावे.तसेच युरिया, डीएपी, पालाश हे सर्व 100ग्रॅमच्या पुढे आणि 150 ग्रॅमच्या आतमध्ये टाकावे. जास्त प्रमाणात खताचा वापर करू नये. नाहीतर झाड जळण्याची शक्यता असते.
पाण्याचे व्यवस्थापन( काळजी )
शेतकऱ्यांनी शेवग्याची पाण्याची काळजी काही जास्त करूच नये.कारण हे पीक म्हणजे कमी पाण्यावर येणारे पीक आहे.याला कमी पाणी असेल तरी काही फरक पडत नाही.या शेवग्याच्या पिकाला जवळपास महिन्यातून दोन ते तीन वेळेस पाणी दिले तरी चालते.जर तुमच्याकडे पाण्याची जास्त टंचाई असेल तर कमीत कमी दोन वेळेस देऊ शकता.
शेवगा शेंगा
शेवगा लागवडीच्या सर्व स्टेप पूर्ण झाल्यानंतर जवळपास सुमारे सहा ते साडेसहा महिन्यानंतर शेवगा पिकास सुरवात होते.आणि तुमच्या कमाईचे दिवस चालू होतात आपण रोपण केलेल्या प्रत्येकी एका झाडाला दुमारे चाळीस ते पंचेचाळीस किलो एवढी शेंग निघते. शेवगा शेंगा काढल्यावर तुम्हाला तर सांगायची गरज नाही जिथे भाव जास्त त्या मार्केट ला विकायची नाही तर व्यापारी लोक असतात ते आपल्या शेतात येऊन माल काढून घेऊन जातात तुम्हाला वाटेल त्याप्रकारे विक्री करू शकता Moringa Planting Information
शेवगा लागवडीचे अनुदान पण मिळते हे अनुदान मिळवण्यासाठी तुमच्या जवळच्या कृषी केंद्रात जाऊन याची माहिती घेऊन अनुदान मिळवू शकता.
Read More : https://marathikeeda.com/sheti-kashi-karavi-in-marathi/