नमस्कार मित्रांनो आज आपण Onion Pohe Recipe Marathi बघणार आहोत की रोजच्या नाश्त्यासाठी अगदी कमी वेळेत आणि झटपट बनवले जाणारे पोहे तर पोहे हे खाद्यपदार्थ नाश्त्यासाठी संपूर्ण भारतामध्ये प्रसिद्ध असलेला एक खाद्यपदार्थ आहे पोहे अगदी सोप्या पद्धतीने आणि कमी वेळेत तयार होणारा नाश्त्याचा प्रकार आहे पोहे जरी संपूर्ण भारतामध्ये प्रसिद्ध असले तरी हा पदार्थ महाराष्ट्र गुजरात आणि कर्नाटक या राज्यामध्ये मोठे प्रमाणात बनवला जातो व हे आपण अगदी कमी वेळेत आणि केव्हाही बनवू शकतो जसे की सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा पाहुणे आल्यावर देखील आपण पोहे बनवू शकतो तर चला तर मग आज आपण बघूया पोहे कसे बनवायच .
कांदा पोहे

कांदा पोह्यासाठी लागणारे साहित्य बघूया
- साहित्य
- तेल
- दोन वाटी पोहे
- दोन बारीक चिरलेले कांदे
- हिरव्या मिरच्या
- कडीपत्ता
- शेंगदाणे
- चिमुट भर जिरे /मोहरी
- हळद /चवीनुसार मीठ
- थोडीशी कोथिंबीर
पोहे बनवण्यासाठी केली जाणारी कृती : Onion Pohe Recipe Marathi
पोहे बनवण्यासाठी दोन वाटी पोहे स्वच्छ प्रकारे निवडून घ्या आणि पाण्याने स्वच्छ धुवून घ्या
आता एक कढई मध्ये त्या मध्ये दोन पळी भरून तेल घ्या ,
तेल गरम झाल्यावर त्यामध्ये जिरे आणि मोहरी टाका, जिरे आणि मोहरी तडतडली की त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून कांदा थोडासा परतूद्या नंतर थोडासा कढीपत्ता आणि बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घाला.
त्यामध्ये थोडेसे शेंगदाणे टाका आता हे सर्व मिश्रण कमी गॅसवर गरम करून घ्या हे सर्व गरम होईपर्यंत एका भांड्यामध्ये भिजवलेले पोहे घ्या त्यामध्ये थोडेसे हळद आणि चवीनुसार मीठ एकत्र करा आता हे पोहे कडे मध्ये टाका आणि चांगल्या प्रकारे पाच ते दहा मिनिटे मध्यम गॅसवर परतून घ्या शेवटी दोन ते तीन मिनिटे कडेवर झाकण ठेवून पोहे वाफवून घ्या वरून थोडीशी कोथिंबीर घाला अशाप्रकारे आपले कांदा पोहे बनवून तयार झाले आहेत.
2 आपण आता पोह्याचा दुसरा प्रकार बघणार आहोत ते म्हणजे दडपे पोहे दडपे पोहे खाण्यासाठी खूप चवदार आणि बनवण्यासाठी झटपट तयार होणारे पोहे म्हणजे दडपे पोहे.
दडपे पोहे : Onion Pohe Recipe Marathi
आपण वेगळ्या पद्धतीने आणि झटपट अशी दडपे पोहे बनवणार आहोत तर दडपे पोहे बनवण्यासाठी लागणारे साहित्य बघूया.
- दोन ते तीन चमचे तेल .
- जिरे / मोहरी .
- बारीक चिरलेला कांदा.
- एक वाटी नारळ खिस.
- थोडीशी कोथिंबीर.
- चवीनुसार मीठ.
- एक लिंबू.
- दोन ते तीन वाट्या पोह.
कृती सर्वात प्रथम पोहे थोडेसे भाजून घ्यायचे आहेत ते भाजल्यामुळे ते चुरचुरीत होतात आता एक कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल गरम करून घ्यावे तेल थोडेसे गरम झाल्यावर त्यामध्ये थोडेसे जिरे मोहरी आणि हळद घालून फोडणी करावी आता आपली ही फोडणी तयार झाली आहे.
नंतर भाजलेले पोहे एका परातीत घेऊन त्यात आपण तयार केलेली फोडणी घालणार आहोत नंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा ओला नारळ फोडणीची मिरची चवीनुसार मीठ आणि एक चमचा साखर घालून योग्य पद्धतीने हे सर्व मिक्स करणार आहोत आता हे सर्व मिश्रण दहा मिनिटांसाठी दडपून ठेवणार आहोत.
अशाप्रकारे आपले दडपे पोहे बनवून तयार झाले आहेत दहा मिनिटानंतर थोडेसे पोहे एक प्लेटमध्ये काढून त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालणार आहोत अशा प्रकारे झटपट प्रकारे आपले दडपे पोहे तयार झाले आहेत.
इंदोरी पोहे

नमस्कार मित्रांनो आत्ताच आपण कांद्या पोहे विषयी माहिती जाणून घेतलेली आहे. आणि कांदे पोहे कसे तयार करायचे आणि त्यासाठी काय सामग्री लागते ते आपण पाहिले आहे. Onion Pohe Recipe Marathi
तर मित्रांनो आता आपण इंदोरी पोहे विषयी माहिती जाणून घेऊ आणि इंदोरी पोहे ला काय काय साहित्य लागते ते पाहूयात तर मित्रांनो इंदोरी पोहे हे मध्य प्रदेश मधील इंदोर या शहरांमधील प्रसिद्ध आहेत.
तसेच त्याच्यामुळे पुण्याचे नाव इंदुरीकर असे पडले आहे हे इंदोरी पोहे लोक खूप आवडीने खातात या पोह्यामध्ये थोडीशी साखर म्हणजे हे पोहे थोडे गोड असतात. Onion Pohe Recipe Marathi
आणि त्याच्यावर थोडीशी शेव पण टाकतात त्याच्यामुळे हे पोहे थोडे गोड आणि तिखट असतात तर चला मित्रांनो आपण पुढे जाणून घेऊयात की इंदुरी पोहे बनवण्यासाठी साहित्य काय काय लागते.
- तीनशे ग्रॅम जाड पोहे.
- तीन चमचा तेल.
- 320 ग्राम तळलेले दाणे.
- तीन मिरची.
- दोन चमचे साखर.
- चवीनुसार मीठ.
- अर्धा चमचा हळद.
- एक चमचा मोहरी आणि जिरे.
- दोन कोथिंबीर.
- 50 ग्रॅम शेव.
- दोन लिंबाचा रस.
- चार-पाच मिरच्या.
- कृती : Onion Pohe Recipe Marathi
तर मित्रांनो सर्वात पहिल्यांदी पोहे पाण्यामध्ये दोन वेळेस चांगले धुवून घेऊन ते नितळ पाण्यामध्ये चांगले भिजवून ठेवायचे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मीठ साखर हळद लिंबाचा रस हे सर्व चांगले पोळ्यामध्ये मिक्स करून घ्यायचे व तसेच ते पाच मिनिटं ठेवून द्यायचे.
त्याच्यानंतर मित्रांनो गॅसवर एका पातेल्यामध्ये दोन मोठे पातेल्यामध्ये पाणी गरम कराच ठेवावे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पोहे टाकून ते पोहे बाजूला काढून घ्यायचे.
आणि ते गरम पाणी फेकून द्यायचे त्याच्यानंतर मित्रांनो कढईमध्ये तेल टाकून ते तेल थोडे गरम करायचे. आणि त्याच्यामध्ये थोडासा कांदा टाकायचा कांदा पाच मिनिट चांगला तळून द्यायचा आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मिरच्या व थोडीशी कोथिंबीर आणि आपण जो जो मसाला घेतला आहे.Onion Pohe Recipe Marathi
तो सर्व त्याच्यामध्ये टाकून द्यायचा व त्याच्यानंतर पोहे टाकायचे आणि ते चांगले सर्व मिक्स करून घ्यायचे आणि ते पोहे दहा मिनिटे चांगले गरम करून घ्यायचे आणि त्याच्यावर काहीतरी झाकून ठेवायचे. Onion Pohe Recipe Marathi
दहा मिनिटं गरम करून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये कोथिंबीर वरून टाकायची आणि आपण जी शेव घेतली होती ती शेव पण पोह्यांवरून टाकायचे तर मित्रांनो अशा प्रकारे आपले इंदोरी पोहे बनतात. तुम्ही नक्कीच आपल्या घरी एकदा हे पोहे बनवून घ्या ह्या पोह्याची चव खूप वेगळी लागते ती तुम्हाला नक्कीच आवडेल.
तर मित्रांनो आज आपण Onion Pohe Recipe Marathi या लेखांमध्ये पाहिलं आहे की कांदा पोहे व इंदोरी पोहे कसे बनवायचे. आणि ते कोठे कोठे प्रसिद्ध आहे ते आज आपण जाणून घेतले आहे तर मित्रांनो तुम्हाला आज हा लेख आवडला असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगू शकता धन्यवाद.
Read more : महाराष्ट्रातील खाद्यपदार्थ विषयी माहिती