Friday, November 24, 2023
HomeAGRICULTUREशेती कशी करावी Sheti Kashi Karavi in Marathi

शेती कशी करावी Sheti Kashi Karavi in Marathi

Sheti Kashi Karavi in Marathi ही जर आपल्याला माहीत नसेल तर त्यांनी शेतीचा अभ्यास करूनच शेती करायला पाहिजे.नाहीतर मशागत तर केली आहे काहीच उगवले नाही. मशागतीचे पैसे पण हाती लागले नाही असे होऊ शकते.अशी समस्या होते आणि आपण आपली शेती पडीक पडतो. 

पण आता पडीक पडायची कसलीच गरज नाही आम्ही आहोत ना शेती कशी करायची हे सांगायला त्यामुळे कसलीच काळजी करू नका.कोणते पीक घ्यायचे,केव्हा घायचे,कोणती वेळ योग्य आहे पीक पीक घेण्यासाठी,कशाप्रकारे मशागत केली पाहिजे,पण्याच नियोजन कसे लावायचे आणि नगदी रोख पिके कोणकोणती घ्यायची हे सर्व आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.फक्त आम्ही सांगितलेल्या पद्धती स्टेप बाय स्टेप तुम्ही फॉलो करा. तुमची शेती पिकेलाच पण बहरून दिसेल.तुम्हाला पण शेतात मशागत करण्याचा कंटाळा येणार नाही.तर पहा पुढीलप्रमाणे.

शेती कशी करावी? Sheti Kashi Karavi in Marathi

मशागत कशाप्रकारे केली पाहिजे?

तुम्हाला तुमच्या शेतामध्ये काहीतरी पेरायचे आहे हे पेरण्याच्या अगोदर तुम्ही शेतामध्ये चांगली मशागत करून तिला सुपीक करून घेणे गरजेचे आहे.तरच पुढचं पीक घेणे योग्यरीत्या येईल.सर्वात पहिल्यांदा तुम्हा तुमची शेती नांगरून घ्यावी लागेल.आणि नांगरटीला चांगले दाबून ओझ ठेऊन नांगरून घ्यावे लागेल.

यामुळे असा फायदा होतो की जमिनीला भुसभुशीपणा येतो.आणि आपली शेती भुसभुशीत झाल्यावर शेती भिजवायला सोपी जाते.पूर्णपणे शेतीला पाहिजे तेवढं पाणी मिळते आणि आपल्या शेतामध्ये हवेचे प्रमाण खेळते राहते.आणि जेव्हा आपण शेतामध्ये शेणखताचा वापर करतो याच चांगल्या नांगरट केलेल्या पद्धतीमुळे शेणखत आपल्या शेतामध्ये चांगल्याप्रकारे मिश्रण होते.आणि आपली जमीन सुपीक बनते.

पाळी घालून घेणे – जेव्हा आपल्या शेतामध्ये नांगरट आणि शेणखत टाकून झाल्यानंतर पाळी घालणे (औत मारणे) आवश्यक आहे. त्यामुळे जे काही मोठाले मोठाले ढेकळं असतात ते बारीक होऊन जातात. अशी शेतीला साफ असा चांगला आकार येतो. आणि शेणखत टाकल्यामुळे जे तन (गवत) उगवले होते ते पाळीद्वारे निघून जाते.ते वेचून फेकायला आपल्याला सोपे जाते. आणि एकदा काय आपली जमीन साफ सुतरी झाली की जमीन भिजवायला अडचण येत नाही आणि जमिनीच्या सर्व भागामध्ये पाणी पोहचते.

जेव्हा आपण शेतामध्ये पाळी घालून घेतो त्यावेळी आपल्या जुन्या पिकाचे मटेरियल पाळी घालता घालता फेकून देण्याचे काम करावे.त्यामुळे जुन्या पिकाचा प्रादुर्भाव आपल्या नवीन पिकावर पडू नये.याची काळजी घेणे बंधनकारक आहे तरच तुम्ही पुढचं पीक घेऊ शकता.आणि एकदम चांगल्याप्रकारे पण येईल.

वरीलप्रमाणे सांगितलेले मशागतीचे फायदे कसे होतात.Sheti Kashi Karavi in Marathi

आपण जर वरील सांगितल्याप्रमाणे योग्य अशी चांगल्याप्रमाणात मशागत केली चागली मेहनत घेतली तर जमीन तर सुपीक होतेच पण तुमच्या जमिनीत असलेल्या बंधावरच्या झाडांचा पाला जो तुमच्या शेतामध्ये पसरतो त्याचे खत तयार होते.आणि या नांगरटीमुळे पाळीमुळे तेही खर आपल्या जमिनीत खाली वरी होऊन मिसळून जाते.आणि आपल्या पिकाला येणारी योग्य ती जमीन तयार होते. Sheti Kashi Karavi in Marathi

मशागत करून झाल्यावर पिकाची निवड.

पिकाचा विषय जर घेतला तर हा खूप महत्वाचा विषय आहे ह्या विषयावर तुमची खरी परीक्षा आहे. कारण तुम्हाला पिकाची निवड करता आली तर तुम्ही चांगल्या प्रकारे शेती करू आणि पिकू शकतात.महत्वाचा मुद्दा पुढीलप्रमाणे

आपल्याला ज्या पण प्रकारची शेती करायची आहे.त्याची माहिती असणे आवश्यक आहे. कारण कोणत पीक कोणत्या सिझन मध्ये घ्यायचे आहे. हे माहीत असणे जरुरी आहे.आणि प्रत्येक पिकाचा एक हंगाम असतो.कवा कोणते पीक हे या हंगामावर निर्धारित आहे.

तुमच्याकडे विहिरीला भन्नाट पाणी असेल किंवा तुम्हा कॅनॉल ची सुविधा सारखी सारखी पुरेशी असेल तर तुम्ही जे पीक किंवा भाजीपाला असे पीक जे की तुम्हाला तुमचे लवकर पैसे मोकळे करतील ते पीक घेत जा, कारण ज्या पीकाचे पैसे लवकर मोकळे होतात ते पीक शेजाऱ्यांना खूप जास्त परवडते.

जर तुमची शेती कोरडवाहू असेल किंवा तुम्हाला पाण्याची कमतरता असेल तर तरी पण काही हरकत नाही.असे पण पीक घेता येते की काही पिकाला जास्त काही भिजवायची गरज लागत नाही. हे पिके तुम्हाला पण माहीत असतील. 

कदाचित नसेल माहीत तर पुढीलप्रमाणे पहा.–बाजरी—तर बाजरीचा विषय घेतला तर कमी पाण्यावर येणारे पीक आहे.आणि याचा फायदा असा आहे बाजरी तर होतेच पण जनावरांना(Animal) खाण्यासाठी चारा पण होतो.जनावरे नसतील तर तुम्ही तो कडबा विकून पैसे मोकळे करू शकतात.त्याचप्रकारे –गहू—ज्वारी—हे पीक पण कमी पाण्यावर येते.

आपण कधीपण आपल्या कृषी विभागाला कनेक्ट आसायला हवं. कारण याहा हा फायदा होतो की आपण त्यांच्या कडून सरकारी सुविधांचा लाभ घेऊ शकतो. एवढंच नाही त्यांच्या कडून चांगले मार्गदर्शन,आपल्या शेतातील माती परीक्षण करू शकतो.या सर्व गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत.Sheti Kashi Karavi in Marathi

माती परीक्षण केल्यावर आपल्या शेतात कोणत पीक जास्त येऊ शकत हे यावर अवलंबून आहे.महत्वाच म्हणजे सरकारने प्रत्येक गावाला एक कृषी सहायक नेमून दिलेला आहे.जेकी तुमची शेती करण्यासाठी मदत करतील.योग्य तो सल्ला देतील.

समजा तुम्ही बाजारामध्ये मध्ये गेला आणि तर विचारपूस करा की कोणत्या मालाला किती भाव आहे. कारण शेतकऱ्यांना बाजारभावाची माहिती असणे आवश्यक आहे. याच माहितीवर तुमची शेती अवलंबून आहे.कारण बाजार भाव माहीत असला की तू तुम्ही जास्त पैसे देणारे पीक शेतामध्ये पिकू शकता.आणि चांगला नफा मिळू शकता. Sheti Kashi Karavi in Marathi

नगदी पिके कोणती?

Sheti Kashi Karavi in Marathi
Sheti Kashi Karavi in Marathi

महाराष्ट्रातील नगदी पिके अनेक आहेत. काही महत्वाचे प्रमुख नगदी पिके म्हणजे मिरची, भाजीपाला, वांगे, तांदूळ, ज्वारी, बाजरी, मुग, तूर आणि उडीद इत्यादी. आहेत Sheti Kashi Karavi in Marathi

शेती करण्यासाठी पाण्याची व्यवस्था

भरपूर म्हटल तर जरा जास्तच प्रमाणात शेतकऱ्याचा एकच प्रॉब्लेम तो म्हणजे पाहिजे तेवढे पिकाला पाणीच मिळत नाही आणि पीक पूर्णपणे खराब होऊन जाते. आणि शेतकरी हतबल होतो.पण आता हतबल होण्याची गरज नाही. शेतामध्ये सरकारच्या अनुदानाने विहीर खांदून घ्या. विहीर पण अशा ठिकाणी करा की तिथून एखादा वाडा,नदी,तलावाच्या शेजारी किंवा एकाध्या पाणी बघणाऱ्या व्यक्तीकडून पाहून विहीर घ्या जेणेकरून तुम्हाला पाण्याची कमी भासणार नाही.

दुसरा पर्याय शेततळे Sheti Kashi Karavi in Marathi

शेततळ्याच्या विषय घेतला तर असा आहे की तुम्ही तुमच्या शेतामध्ये शेततळे बनवले तर जेव्हा तुम्हाला विहिरीचे पाणी लागत नाही त्या वेळेला त्या विहिरीचं पाणी आपल्या शेत तळ्यामध्ये सोडावे,आणखी पावसाचे पाणी सरी करून शेत तळ्यात सोडावे.हे शेत तळ्याचे पाणी जेव्हा तुम्हाला विहिरीचे पाणी कमी पडेल तेव्हा उपयोगी येईल आणि या शेत तळ्याचा तुम्हाला कसलाच खर्च नाही कारण शेत तळ्याचे पैसे तुम्हाला सरकारकडून अनुदानाच्या स्वरूपात मिळते.Sheti Kashi Karavi in Marathi

पण अनुदान मिळवण्यासाठी अगोदर तुम्हाला तुमच्या स्वखर्चातून शेततळे खोदून घ्यावे लागते.आणि नंतर त्याचे अनुदान मिळते,अनुदानाचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला नेमून दिलेला तुमच्या गावचा कृषी सहायक यांची मदत घ्यावी लागते.

Raed More : https://marathikeeda.com/cotton-rate-updates/

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments